निपाणी नगरी वृत्तसेवा (13)
रविवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2026 रोजी हरूगिरी या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्री जी एम संकपाळ हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी संतोष पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावला व तिचे पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर विद्यार्थिनीला संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले. तर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व क्रीडा शिक्षक तसेच पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.