निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
येथील लिटल एंजल स्कूल मध्ये आज खाद्य महोत्सव साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन शाळेचे व्हॉइस चेअरमन सचिन खोत यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. दरम्यान उपस्थित असलेल्या शाळेचे चेअरमन प्रसन्नकुमार गुजर,मुख्याध्यापिका पूजा टेपूगडे शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी आणि पालक यांचा समावेश होता.
शाळेत लहान गटा पासून मोठ्या गटा पर्यंत सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींनी खाद्य महोत्सवामध्ये सहभाग दर्शविला होता. राजस्थानी गुजराती भारतीय तसेच चायनीज अशा प्रकारचे विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले होते. शरीरासाठी उपयुक्त असणारे पौष्टिक पदार्थ होतेच पण जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जंक फूड सुद्धा विद्यार्थ्यांनी बनवले होते.
चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर व कर्मचारी स्टाफ यांनी मुलांना पैसे देऊन ते पदार्थ विकत घेतले आणि त्याचा आनंद घेतला. त्यामुळे मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळाले पण स्वतः थोडेफार कष्ट करून मिळवलेले पैसे याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अशाप्रकारे या खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी आनंद घेतला पण शिक्षकांनी सुद्धा सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला