श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
तळेगांव : श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ,तळेगांव दाभाडे यांच्यावतीने सन २०२०-२१ इयत्ता दहावी मध्ये उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.
तळेगांव दाभाडे परिसरातील १७ माध्यमिक शाळेतील इयत्ता १०वी परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ,तळेगांव दाभाडे यांच्यावतीने लायन्स क्लब सभागृह या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमास श्री. विशालजी मोरे, उत्कृष्ट समालोचक यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर(जितुभाऊ)खळदे, संजयजी शिंदे, प्रा. महादेव वाघमारे,रेश्मा फडतरे यांनी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमास धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले, विद्यमान अध्यक्ष विजयराव शेटे, सचिव विनोदजी टकले,तळेगांव शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक, पत्रकार, उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे सदस्य मयुर पिंगळे, विराज टोंगळे,आदित्य टकले, अमोल पाटील, प्रथमेश शेटे, संग्राम शिंदे,सागर लगड व सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.