निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
“कोगनोळी येथे महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सकाळी प्रतिमापूजन व अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामस्थ, युवक मंडळे आणि विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. वक्त्यांनी महामानवांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. गावातील सर्वांसाठी गायन स्पर्धांचे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. गावात सर्वत्र प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.”
येथील संविधान मानवता सेवाभावी संस्था व कोगनोळी कराओके गायन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत रोहिदास महाराज व माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त ‘संविधान आयडॉल २०२६’ भव्य गायन स्पर्धा पार पडली.
दरम्यान,’संविधान मानवता सेवाभावी संस्था’ नवीन सामाजिक संस्थेचे उद्घाटन सचिन खोत (चेअरमन, कोगनोळी दत्तगुरु संस्था, कोगनोळी), मुख्याध्यापक धनंजय ढोबळे, नितीन कानडे यांच्या शुभ हस्ते झाले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महेश धम्मरक्षित, राष्ट्रीय संघटक प्रा. पी. एस. कांबळे, निपाणीचे प्रताप शितोळे, लक्ष्मण जगताप, विद्यासागर बाळीकाई उपस्थित होते. यावेळी कर्नाटक संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांचा कोगनोळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला. भारतीय लष्करात भरती झालेल्या मीरा मुरलीधर मेस्त्री व संकेत सातापा आवटे यांचा गौरव केला.
सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत चाललेल्या कराओके स्पर्धेत राजवर्धन तगारे व पुजा शेंडगे, स्वजाली सुतार व वासीम मुजावर, शिवम कुरुंदवाडकर व कोमल बाकेकुंद्री, तर सृष्टी सावरे व सचिन कांबळे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून झीनत शेख व डॉ. अमन पठाण यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोसले, प्रवीण खोत, प्रशांत नवाळे, मन्सूर शेंडुरे, विठ्ठल कोळेकर, सुवर्णा पटेकर उपस्थित होते. प्रास्ताविक नितीन कानडे यांनी केले, स्वागत प्रा. विठ्ठल दिवटे यांनी तर आभार नरजीत विटे यांनी मानले.