ताज्या घडामोडी
गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या मूर्ती बाजारात दाखल
तळेगाव : उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या गणेशाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.
तालुक्यातील लोणावळा, कामशेत, तळेगाव ही महत्त्वाची व्यापारी केंद्र असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री केंद्र उभी आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविकांची येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. यावर्षी लालबागचा राजा, फेटेवाला गणपती यांना विशेष मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मूर्तींचे दर स्थिर आहेत.
भावीक आपल्या मागणीनुसार मूर्तींवर रंगकाम करून घेताना आढळत आहेत. तर मूर्तीकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत.कलाकेंद्रातील मूर्तीकार कामात मग्न आहेत. तर भक्तांमध्ये सणाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे.