निपाणी नगरी वृत्तसेवा (21)
अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल, कोडणी- निपाणी येथे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक योगा दिवस अतिशय उत्साहात पार पाडला. 21 जून हा सर्वत्र जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देखील जागतिक योगा दिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे संचालक श्री नारायण चौगुले, संचालिका सौ.नम्रता चौगुले तसेच शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले व प्राचार्य सौ चेतना चौगुले यांनी आपली उपस्थिती दर्शविली. शाळेचे संचालक श्री नारायण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक रित्या निरोगी राहण्यासाठी रोज योगा व व्यायाम नियमित करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. त्याचप्रमाणे योगा व त्याचे आध्यात्मिक महत्त्व, शास्त्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजावून सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी योग्य आणि पौष्टिक आहाराची सवय लावून घ्यावी व बाहेरील तयार अन्नपदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावे याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले.
यानिमित्त शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये श्री नारायण चौगुले, सौ नम्रता चौगुले यांच्या समवेत शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले व सर्व विद्यार्थी यांनी विविध योगा करून हा समारंभ अतिशय उत्साहात साजरा केला .यामध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार ,गरुडासन ,पवन मुक्तासन ,नौकासन, मर्कटासन, भुजंगासन, वृक्षासन, सिंहासन अशा वेगवेगळ्या आसनांची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आली.
त्याचप्रमाणे योगा दिन व जागतिक पितृ दिनाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसोबत योगा करण्याचा आनंद या क्षणी अनुभवला. शाळेतर्फे पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या साठी वडिलांसोबत योगा दिन साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या क्षणी सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्या पाल्यासोबत जागतिक पितृ दिन व योगा दिन एकत्रित साजरा केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी कुमारी आराध्या खोत व विद्यार्थी स्वयं रणदिवे यांनी केले तर कुमारी आराध्या कोळकी हिने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व ओळख करून दिली. शाळेचे शिक्षक श्री सौरभ कांबळे यांनी योग दिनाची प्रतिज्ञा करून घेतली व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले. यावेळी शाळेचे संचालक श्री नारायण चौगुले, संचालिका सौ नम्रता चौगुले, प्राचार्या सौ चेतना चौगुले यांच्या समवेत शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग उपस्थित होता.