निपाणी नगरी वृत्तसेवा (19)
निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी निपाणी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला.
या विशेष कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक प्रवीण ज्ञानेश्वर पाटील यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. तसेच विविध योगासने व प्राणायामाचे प्रकार प्रत्यक्ष सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, वयाच्या ७१ व्या वर्षीही प्रवीण पाटील यांनी योगाच्या माध्यमातून शरीर कसे सुदृढ, लवचिक व निरोगी ठेवता येते, याचे जिवंत उदाहरण उपस्थितांसमोर ठेवले. त्यांच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना प्रेरणा मिळाली.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, प्राथमिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की तसेच एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, सविता तावदारे व लेखनिक मुकुंद कोरे उपस्थित होते.
तसेच प्राथमिक विभागाचे एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली. “दररोज योग, आयुष्यभर निरोग” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
“योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समन्वय साधणारी जीवनशैली आहे. निरोगी भारताच्या निर्मितीसाठी योगाचा स्वीकार ही काळाची गरज आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.