निपाणी नगरी वृत्तसेवा (30) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्या हस्ते बैल जोडीचे पूजन करण्यात आले बैलांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या गजरात बैलजोडींचे स्वागत करण्यात आले तर सांस्कृतीक विभाग प्रमुख व्ही आर पाटील यांनी बैलपोळा सणाचे महत्व व शेतकऱ्याचे महत्त्व मनोगतातून व्यक्त केले
यावेळी ज्येष्ठ शिक्षक आर डी पाटील, आर एस भोसले,आर डी देसाई यांच्यासह शिक्षक प्रतिनिधी एस बी यादव कर्मचारी प्रतिनिधी ए व्ही तेली यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.