भावपूर्ण श्रद्धांजली
निपाणी नगरी वृत्तसेवा (30)
शिरगुपी (ता. निपाणी) येथील ज्येष्ठ नागरिक कै. सौ. शकुंतला (शाकुबाई) नारायण जाधव (वय 78) यांचे आज गुरुवारी, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शिरगुपी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सौ. शाकुबाई या अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या महिला म्हणून सुपरिचित होत्या. आपल्या शांत व सोज्वळ स्वभावाने त्यांनी परिसरात मोठा आपुलकीचा वर्ग निर्माण केला होता. त्यांच्या पश्चात पती, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन कार्यक्रम:
कै. सौ. शकुंतला जाधव यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता शिरगुपी स्मशानभूमीत पार पडणार आहे, अशी माहिती जाधव कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.