निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
दि. फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यिनींच्या पालकांचा मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत गुरुपौर्णिमेनिमित्त पालकांचे पाद्यपूजन करण्याचा एक आगळावेगळा आणि भावूक उपक्रम राबवण्यात आला, ज्याला पालक व विद्यार्थीनी कडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह, मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस. जे. पाटील, श्री आर .पी .बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानी प्रास्ताविक भाषणात शाळेमार्फत दहावी विद्यार्थीनींसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ. प्रविणा शहा म्हणाल्या,” दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील किती महत्त्वाचा टप्पा आहे, यावर प्रकाश टाकला. शाळा, शिक्षक आणि पालक यांनी हातात हात घालून काम केल्यास विद्यार्थ्यांचे यश निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले. अभ्यासासाठी मानसिक व भावनिक पाठबळ देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकां सोबतच पालकांचे योगदानही मोलाचे असते,” असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
सौ ए.आर. पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. भारतीय संस्कृतीत ‘माता-पिता हेच पहिले गुरु असतात’. या भावनेतून विद्यार्थ्यांनीनी आपल्या पालकांचे पाद्यपूजन करून त्यांचे औक्षण केले. अनेक पालकांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या मनात पालकां बद्दल असलेला आदर आणि कृतज्ञता दिसून आली.
यावेळी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी शाळेचे आभार मानले.
याप्रसंगी सौ एम एम चिकोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यु बी नागावे, एस आर ईराज, ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, पी. आर. पाटील, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी के.आर. चोपडे. पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या शेवटी सी एम बाडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.