निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बंगळुरू मधील नामवंत, व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणीच्या वतीने महर्षी वाल्मिक जयंती व कित्तूर राणी चन्नम्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी कुरबेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, सिद्धेश्वर महास्वामीजी, व महर्षी वाल्मिक,आणि कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थेच्या महिला कर्मचारी पूजा इंगळे यांनी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. तर कर्मचारी दिलीप गायकवाड यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांनी रामायण हे संस्कृत भाषेतील महाकाव्य लिहिले व वाल्याचा वाल्मीक ऋषी कसा झाला याचे विचार उपस्थिता समोर मांडले तर सुरज घोडके आणि सन्मती भिकन्नावर ,यांनी एस आय पी व म्युच्युअल फंड गुंतवणूक संदर्भात कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन किशोर बाली संचालक एस आर पाटील श्रीकांत परमणे, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सुरेश शेट्टी, दिनेश पाटील, राजेश पाटील संचालिका पुष्पा कुरबेट्टी विजया शेट्टी सुवर्णा पट्टणशेट्टी सीईओ एस के आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, महादेव बडगीर ,चंद्रकांत हंबर, यांच्यासह कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार निलेश चौगुले यांनी मानले.