निपाणी नगरी वृत्तसेवा (18)
युवा सबलीकरण आणि क्रीडा इलाखे आणि दसरा क्रीडा उपसमिती यांच्यामार्फत दसरा क्रीडाकोट चीफ मिनिस्टर कप 2026 यांच्या अंतर्गत दिनांक 11 व 12 ऑक्टोबर रोजी म्हैसूर येथे तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये निपाणी येथून सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती या स्पर्धेमध्ये 45 किलो आतील वजन गटांमध्ये समर्थ निर्मले यांनी अंतिम फेरीपर्यंत लढत देत रोप्य पदक पटकावले तर मुलींच्या गटात 65 किलो आतील वजन गटात सौम्या खोत या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकावले यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व के एल ई सी बी एस ई शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे प्रोत्साहन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले सह प्रशिक्षक देवदत्त मल्हाडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.