निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (14)
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर के आय टी कॉलेजच्या डॉ प्रियांका माने या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना माने म्हणाल्या “शाळेत आपल्या आयुष्याचा पाया घातला जातो, प्रयत्न प्रामाणिक असल्यास आपल्याला पोषक परिस्थिती निर्माण करता येते, अपयशाने खचून न जाता यशा खेचून आणावे, प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकास नशीब साथ देते, सध्या एआय चा वापर योग्य पध्दतीने केला पाहिजे, इतरांना मदत केल्यामुळेच आपण मोठे होतो .”
प्रारंभी कार्यक्रमाच्या *प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी शाळेने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा चढता आलेख वर्णन करून सांगितला
प्रमुख पाहुण्यांची ओळख स्नेहसंमेलन प्रमुख एस एच श्रीखंडे यांनी करून दिली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक आर डी पाटील, आर एस भोसले, शिक्षक प्रतिनिधी एस एम चौगुले ,कर्मचारी प्रतिनिधी ए आर कोळी, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचलन यु एम सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन आर एस भोसले यांनी केले कार्यक्रमाला अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.