निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (14)
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या 52 विद्यार्थ्यांनी 2025-26 मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला स्पर्धेत सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले व शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इंटरमिजिएट परीक्षा प्रकारात ए ग्रेड 6, बी ग्रेड 8, सी ग्रेड 2.तर एलिमेंट्री परीक्षा प्रकारात ए ग्रेड 12, बी ग्रेड 10, तर सी ग्रेड 14इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सचिन मेंगाणे यांचे मार्गदर्शन लाभले व मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांचे सहकार्य लाभले तर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.