निपाणी नगरी वृत्तसेवा..(26)
देवचंद महाविद्यालयात संस्थेच्या क्रीडांगणावर ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन झाले.
या शुभप्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, विश्वस्त श्री. प्रकाश चंदुलाल शाह, श्री. प्रदीप मोकाशी, ॲड. राजू पाटील (अकोळकर), देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी. डी. इंगळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव, पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर, एम. डी. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. गोडबोले, देवाशिष लॉ कॉलेजचे प्रभारी प्राचार्य ॲड. एस. ए. गुळवणे, किरणभाई विद्यानिकेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. एस. टी. जाधव, मराठी कॉन्व्हेंटचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. एस. के. कांबळे, देवाशिष ग्लोबल स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती के. ए. मोहिते, जनता शिक्षण मंडळ खाजगी आय. टी. आय. चे प्राचार्य श्री. एम. पी. भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवानंद चौगुले यांनी केले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एन. सी. सी. व व्हाईट आर्मी कॅडेट्स यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर आधारित “संगीत कवायत” सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास गिरिजा पाटील, सागर मगदूम, क्रीडा शिक्षक अविनाश आळवे, निरंजन जाधव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.