निपाणी नगरी वृत्तसेवा(1)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि निपाणी तालुक्यातील अग्रेसर श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने भगवान महावीर व रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन आणि विद्यमान व्हाईस चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी व संस्थेचे चेअरमन किशोर बाली सीए यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर तसेच सिद्धेश्वर महास्वामीजी व भगवान महावीर आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये बोलताना डॉक्टर सी बी कुरबेट्टी म्हणाले की भगवान महावीर यांच्या अहिंसा व अपरिग्रह आणि अनेकांत विचारांची व्यवहारिक अंमलबजावणी अखंड मानव जातीला विनाशा पासून वाचवु शकते. हिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हत्या करणे एवढे नसून विचाराची हिंसा अशा तीन स्तरावर लक्षात घेणे आवश्यक आहे आपल्या प्रमाणे दुसऱ्याचांही जीव आहे त्यामुळे प्राण्याची व मनुष्य जातीची हत्या करू नये असा महत्त्वाचा उपदेश त्यांनी दिला. आपले अखंड आयुष्य मानव जातीच्या कल्याणासाठी खर्च केले असे सांगितले.
तसेच चेअरमन किशोर बाली यांनी बोलताना सांगितले की रामनवमी हा हिंदू सण आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला भगवान श्रीरामाचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. त्रेता युगात अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूचा सातवा अवतार श्रीरामाचा जन्म झाला म्हणून हा दिवस पवित्र मानला जातो. प्रभू रामचंद्रांनी नेहमी सत्याचा मार्ग आपल्या अखंड आयुष्यामध्ये जपला. सत्याचा जयजयकार केला राम हा एक पत्नी एक वचनी व धर्माचा पालन करणारा राजा होता. दशरथ राजाच्या म्हणजेच वडिलांच्या आज्ञेनुसार श्री रामानी 14 वर्षे वनवास भोगला. आज नेहमी प्रभू श्रीरामाचा सत्याचा मार्ग तो आजही मानव समूहास उपयुक्त पडत आहे. रामाने आपले आयुष्य अयोध्या नगरीतील लोकांच्या कल्याणासाठी घालवले रामाने नेहमी सत्याचा स्वीकार केला असे सांगितले. तसेच संस्थेचे कर्मचारी महेश कमते व विनायक चोचनावर व पूजा इंगळे यांनी भगवान महावीर व प्रभू श्रीराम यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमास शाखा संचालक डॉक्टर एस आर पाटील प्रताप पट्टनशेट्टी सुरेश शेट्टी महेश बागेवाडी श्रीकांत परमणे अशोक लिगाडे दिनेश पाटील राजेश पाटील संचालिका पुष्पा कुरबेट्टी विजया शेट्टी सुवर्णा पट्टणशेट्टी तसेच सीईओ एस के आदन्नावर असिस्टंट सीईओ महेश शेट्टी विद्या कमते सुरज घोडके राजेंद्र मगदूम सुरेश आवटे. चंद्रकांत हंबर व संस्थेचे कायदेतज्ञ वकील विजय श्रीपणनावर व असंख्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.