निपाणी नगरी वृत्तसेवा..(29)
अभिजीत मराठी भाषा व्यवहारात जास्तीत जास्त उपयोगात यावी या हेतूने देवचंद महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला . या उपक्रमाचे उद्घाटन कॉलेजच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी .डी. इंगळे यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की मातृभाषेतूनच खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवहारात जास्तीत मराठी भाषा वापरली पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ वाचनाचा आनंद घेतला पाहिजे. ग्रंथ वाचनातूनच व्यक्तिमत्व विकास हा घडत व नवनिर्मितीस चालना मिळते. कार्यक्रमाची सुरुवात माहितीपट दाखवून करण्यात आला यावेळी “भावगीत आणि भक्तीगीत गायन “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .एम .ए भाग १ विद्यार्थ्यांनी सानिका पाटील हिने गीत गायन केले. यावेळी अनेक मराठीतील प्रसिद्ध भावगीते तिने म्हटली. दुसऱ्या दिवशी एम .ए. व बी. ए च्.या विद्यार्थ्यांना नेट/ सेट कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी श्री किरण खोत व श्री उत्तम कमते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये नेट/ सेट परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम ,नोट्स कशा काढाव्यात ,सराव कसा करावा हे समजावून सांगितले. वाचन संस्कृती ही रुजावी म्हणून ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यावेळी कोणतेही पुस्तक केवळ पाच रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी स्टॉल बुक वर झाली. या प्रेरणादायी उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ तृप्तीभाभी शाह ,संस्थेचे खजिनदार श्री सुबोधभाई शाह, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व उपक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख रमेश साळुंख ,डॉ. आशालता खोत ,डॉ.प्रवीण सिंह शिलेदार, प्रा.कृष्णामाई कुंभार, प्रा. प्रकाश पाटील, प्रा.विष्णू पाटील प्रा. शिवाजी कुंभार यांनी केले.