निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)
मराठा मंडळ बेळगाव संचालित मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मराठा मंडळचे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रमोद पाटील यांनी भुषविले.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा आर घाटगे यांनी श्री प्रमोद पाटील यांना रोप व शाल देऊन सत्कार केला. तसेच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ जी बी पाटील यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा घाटगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्या बद्दलची माहिती नववीचा विद्यार्थी कुमार स्वर चौगुले याने विद्यार्थ्यांना दिली. तसेच सौ स्नेहा आर घाटगे कारकिर्दीची माहिती नववीची विद्यार्थिनी कु रिद्धी एम चौगुले हिने दिली.
यानंतर मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला मानवंदना दिली.
शालेय शिस्तीचे प्रतीक दाखवत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी शुभ्रा कामते, इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी पलक शिंत्रे व फलक पटेल यांनी आपापल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधाना बद्दल विविध माहिती सांगितली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी विद्यार्थ्यांना देशाभिमान बाळगण्या बद्दल तसेच शिस्त पालन स्वच्छता करून देशाच्या विकासात मदत करण्याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु साईना ए सुतार आणि कु प्रांजल ए जिनगे या नववीच्या विद्यार्थिनींनी केले. कुमारी रेणू घोटणे या नववीच्या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जिलेबी वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता मराठा मंडळ बेळगावच्या अध्यक्षा डॉ सौ राजश्रीजी नागराजू तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा आर घाटगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. याशिवाय शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.