निपाणी नगरी वृत्तसेवा (31)
तहसीलदार प्लॉट येथील रहिवासी श्री गणेश बाबासाहेब चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ सरिता गणेश चव्हाण यांचे आकस्मिक निधन.
घटनास्थळावरून व ऐकीव माहितीनुसार सौ चव्हाण यांना निपाणी येथील खाजगी रुग्णालयात रात्री नऊच्या दरम्यान डिलिव्हरी साठी घेऊन गेल्या असता. डिलिव्हरी झाल्यानंतर लागलीच त्यांचे निधन झाले. नवजात अर्भकाचा देखील त्यामध्ये समावेश आहे.
सौ चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व चांगला होता. त्यांनी गरोदरपणा मध्ये अतिशय काळजीपूर्वक सर्व तपासण्या केल्या होत्या. पण ऐन वेळेला त्यांच्या शरीरामध्ये अचानक बदल झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत डिलिव्हरी मध्येच मालवली. त्यांच्या पश्चात पती गणेश चव्हाण सासुबाई व चार लहान मुली आहेत. मोठी मुलगी सोळा वर्षाची असून सर्वात लहान मुलगी आठ वर्षाची आहे. त्यांच्या अचानक जाण्याने तहसीलदार प्लॉट परिसरात सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान स्मशानभूमीत घेऊन जाणार आहेत.