निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
निपाणी येथील जुना पी. बी. रोड, नवीन टीव्हीएस शोरूम शेजारी सुरू झालेल्या ओमकार बेकर्स शॉपच्या उद्घाटनाचा सोहळा शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण पूजेसह भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. या मंगल प्रसंगी श्रीमती शकुंतला मारुती पाटील व सौ. सुमन तुकाराम भारमल यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ओमकार बेकर्स शॉपी चे प्रोप्रायटर अरुण मारुती पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. विलास गाडीवड्डर, श्री. विनायक वडे, श्री. सचिन खोत (चेअरमन श्री कोगनोळी दत्तगुरु संस्था), श्री.अमोलसिंग राजपूत व राजपूत परिवार यांची उपस्थिती लाभली. तसेच कु. योगिता अशोक पाटील (Master of Data Science, Macquarie University, Sydney Australia), श्री. अशोक मारुती पाटील व कु.अनुराग अरुण पाटील यांनीही कार्यक्रमास हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. कोगनोळी दत्तगुरु संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री सचिन खोत म्हणाले, “निपाणी शहरात दर्जेदार व स्वच्छ खाद्यपदार्थ देणारे नवीन व्यावसायिक पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ओमकार बेकर्स निश्चितच ग्राहकांचा विश्वास संपादन करेल.”
विलास गाडीवड्डर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “स्थानिक पातळीवर उद्योग उभारणे ही मोठी धाडसाची गोष्ट आहे. युवकांनी अशा व्यवसायातून स्वावलंबनचा मार्ग स्वीकारावा, ही अपेक्षा व्यक्त केली”
सत्यनारायण पूजेनंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. परिसरातील व्यापारी, नागरिक व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन व्यवसायाला शुभेच्छांचा वर्षाव केला. एकूणच भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात हा उद्घाटन सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमास सरिता पाटील, महेश माकणे, अभिजीत राजपूत, संतोष पिसे, प्रणव भाटले, सागर कुलकर्णी, संदीप संकपाळ, मुकुंद रावण, कृष्णात पाटील, दिपाली पाटील, मोनाली पाटील, नरेंद्र बाडकर, मराठा व्यवसाय संघाचे सर्व पदाधिकारी तेजस भारमल, सुमन भारमल, सचिन शिंत्रे, मिलिंद शहा, ओमकार बेकर्शॉस शॉपीचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.