निपाणी नगरी वृत्तसेवा..(13)
दि.फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथीबाई शाह कन्या शाळेतील विद्यार्थीनी कु. समिक्षा सोमनाथ चौगुले इयत्ता 9वी हीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत उज्वल यश संपादन केले आहे.
नुकत्याच निपाणी येथे शांती निकेतन मराठी माध्यम हायस्कूल तर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये तिने प्रथम क्रमांक पटकाविला. “वृद्ध आई वडिलांची व्यथा” या विषयांवर उत्कृष्ट भाषण केले, या अगोदरही अनेक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धामध्ये तीने प्राविण्य मिळविले आहे. संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह व व संचालक मंडळाचे प्रोत्साहन तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ सौ. एस. जे.पाटील, सौ. ए. आर. पाटील, आई सुनिता चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.