निपाणी नगरी वृत्तसेवा..(12)
दि. फिमेल एज्यूकेशन सोसायटी संचलित सौ. भागीरथीबाई शाह कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी सौ. अर्चना सचिन मेहता. डॉ. सौ. स्नेहा शाह, सौ. शालमी प्रसन्नकुमार दोशी या उपस्थित होत्या.
यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस. जे. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत भाषण केले. तसेच सौ. अर्चना सचिन मेहता यानी आपल्या मनोगतातून हळदीकुंकू कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. त्या म्हणाल्या पूर्वीच्या काळी महिलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडता येत नव्हते. त्यामूळे अश्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या विचारांची देवाण-घेवाण होत असे. त्याच बरोबर आपली संस्कृती आपल्या मुलांना समजली पाहिजे. व यांचे संस्कार आपणच मुलांना दिले पाहिजेत असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी गर्ल्स मराठी कॉन्हेंट स्कूलचे मुख्याध्यापक श्री आर. पी. बामणे उपस्थित होते. तसेच सर्व माता पालक उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन आशिषभाई शाह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी यु. बी. नागावे, एम. एम. चिक्कोडे, एस. आर इराज, सी. एम., बाडकर, ए.डी. पाटील, पी. आर. पाटील, जे एमू शिंत्रे, जे.सी. चंद्रकुडे, पी. एम कवाळे, आर ए. कांबळे, ए. आर पाटील. पी. एम. निगवे, एस आर घाटगे, आर.वी. मधाळे, ओ.एम. कुलकर्णी, के. एम. मंगसुळे, शशिकांत हवालदार, सुभाष माळी, एस.पी. तिप्पे, एस एस सुतार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी सर्व वर्गातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सौ जे कुरबेट्टी यांनी मानले.