निपाणी नगरी वृत्तसेवा,,(17)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित ,सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत कै. संघवी शेठ चंडुलाल मोहनलाल शाह यांचे स्मरणार्थ आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या बक्षीस वितरण प्रसंगी श्रीमान प्रकाश चंडुलाल शाह संस्थेचे संचालक श्रीमान प्रसन्न दोशी, सौ. श्रेयल अमित शहा श्री.एस एस एल्लटी आर पी बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे.पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमान प्रकाश चंडुलाल शाह व सौ श्रेयल अमित शाह यांच्या हस्ते झाले. आंतरशालेय स्पर्धेत पुढील संघानी क्रमांक मिळविला
प्रथम क्रमांक- सौ भा.शाह कन्या शाळा निपाणी
द्वितीय क्रमांक- सिद्धेश्वर विद्यालय कुरली विजयी संघांना ढाल प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले स्पर्धेसाठी पंच म्हणून सौ जी. एम. पाटील ,अभिषेक घोडके ,ए.ए.चौगुले यांनी काम पाहिले
कार्यक्रमास क्रीडा शिक्षिका ए. डी.पाटील यु बी नागावे ,एम एम चिकोडे ,एस. आर. इराज, ए आर पाटील, एस एस घाटगे, आर आर सुतार, के एन मंगसुळी, जे एम शिंत्रे, जे सी चंद्रकुडे, के एस भादुले, जयश्री कुरबेट्टी, पी.आर पाटील, ओ एम कुलकर्णी ,आर ए कांबळे, एस आर हवालदार, सुभाष माळी आदी कार्यक्रमास उपस्थित होते .शेवटी सीएम बाडकर यांनी आभार मानले.