निपाणी नगरी वृत्तसेवा (16)
दिनांक 05 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान देवचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शारीरिक सुदृढता प्रशिक्षण शिबिर तसेच पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्साहात संपन्न झाले. देवचंद कॉलेज क्रीडा विभाग व योद्धा फिटनेस क्लब निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये कॉलेज व बाहेरील अशा 23 मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रशिक्षणा दरम्यान खेळाडूंना शारीरिक सुदृढता, गोळाफेक, धावणे, उडी मारणे, समतोल आहार व पूरक आहार असे भरतीसाठी आवश्यक बाबींचे सखोल मार्गदर्शन व सराव घेण्यात आला. देवचंद कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण योद्धा फिटनेस क्लबचे श्री सुरज आदमापुरे, श्री.राम पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी ज.शि. मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी .डी.इंगळे , IQAC प्रमुख डॉ. पी.डी. शिरगावे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, जिमखाना कर्मचारी श्री. वैभव सोनार व श्री. शिवदास चव्हाण श्री. आनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.