निपाणी नगरी वृत्तसेवा..(19)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम शाळा निपाणी व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी या ठिकाणी शांतिनिकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले श्रीनिकेतन शाळेचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी शाळेचे सेक्रेटरी प्रदीप पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले यांच्यासह सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीताने केली इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले स्वागत व प्रास्ताविक इयत्ता सहावीचा विद्यार्थी रुद्र मगदूम यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत झाले त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ सुनीता नारे तसेच मुख्याध्यापिका सौ अलका भोसले यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन सुबहान रामपुरे यांनी केले.