निपाणी नगरी वृत्तसेवा | शिरगुप्पी (ता. निपाणी)
“शिरगुप्पीत इस्कॉनतर्फे वार्षिक हरिनाम महामहोत्सवाचे आयोजन नगर संकीर्तन, पालखी यात्रा, अभिषेक, प्रवचन व महाप्रसादाचा भव्य सोहळा; 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 4 ते 8.30 या वेळेत”
ISKCON (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) शाखा बेळगाव – प्रचार केंद्र शिरगुप्पी यांच्या वतीने वार्षिक हरिनाम महामहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 2026 सालच्या चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या महोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात नगर संकीर्तनाने होणार असून त्यानंतर पालखी यात्रा, अभिषेक, भजन, प्रवचन आणि शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिनांक: मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026
वेळ: सायंकाळी 4.00 ते 8.30
स्थळ: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिरगुप्पी
प्रवचनकार: बेळगाव येथील वरिष्ठ भक्त
महोत्सवाच्या निमित्ताने “हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम, राम राम हरे हरे” या महामंत्राच्या अखंड गजरात भक्तांना अध्यात्मिक उन्नतीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी प्रवचन, कीर्तन व प्रसादाचे आयोजन नियमितपणे केले जाते. भाविकांनी लक्ष्मी, वस्तू रूपाने किंवा अन्नधान्य रूपाने सेवा करावयाची असल्यास संयोजक कमिटीशी संपर्क साधण्याचे करण्यात आले आहे.
शिरगुप्पी परिसरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला जपत हा भक्तीमय सोहळा पार पडणार असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.