निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
मराठा मंडळ बेळगाव संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी नववी व दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा संपन्न झाला.
इयत्ता दहावीच्या दोन सत्र परीक्षा संपन्न झाल्यावर पालकांना त्यांच्यातील प्रगती पाहण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी पालकांना विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीचा अहवाल दाखवण्यात आला व दोन्ही सत्र परीक्षेत मिळवलेल्या गुणांचे विवेचन करण्यात आले. मुलांना अजून अभ्यास कशाप्रकारे करून जास्तीत जास्त गुण मिळवता येतील तसेच वेळापत्रक कसे बनवावे स्वतःच्या तब्येतीची काळजी परीक्षे पर्यंत कशी घ्यावी याविषयीचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा आर घाडगे यांनी पालक व विद्यार्थ्यांना केले.
तसेच नववीच्या पालक व विद्यार्थ्यांना पुढील वर्षभरासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली. पालकांच्या विविध प्रश्नांचे व शंकांचे निरसन शाळेतील शिक्षकांनी योग्य प्रकारे केले. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्रीजी नागराजू, शाळेच्या प्राचार्या र्सौ स्नेहा आर घाटगे शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.