निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व कर्नाटक राज्य सौहार्द फेडरेशन मधील नामवंत. श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित निपाणी या संस्थेच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 28/02/2026 रोजी सकाळी ठीक 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत श्री महात्मा बसवेश्वर सभागृह मुख्य कार्यालय चिकोडी रोड निपाणी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
यामध्ये नेत्ररोग, हृदयविकार, अस्थिरोग, मज्जारोग, स्त्रीरोग, कृत्रिम गर्भधारणा इत्यादी आणि औषधोपचार तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे व आपली नावे मुख्य कार्यालय चिकोडी रोड निपाणी व नजीकच्या शाखेत दिनांक 27/02/2026 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत नोंद करावी. तरी या संधीचा लाभ निपाणी व आजू बाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा व रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता सर्वांनी वर्धापन दिनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.