निपाणी नगरी वृत्तसेवा..(4)अर्जुननगर
कोल्हापूर जिल्हा भारत स्काऊट व गाईड तर्फे चिंतन दिनानिमित्त आयोजित कब, बुलबुल, स्काऊट-गाईड व बनी मेळावा उत्साहात पार पडला. या जिल्हास्तरीय मेळाव्यात अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या कल्पना चावला या गाईड पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, शिस्तबद्ध संचलन, सादरीकरण, हस्तकला, गाठी बांधणे, प्रथमोपचार कौशल्य तसेच अनुषंगिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या समृद्धी रावण,रिया यादव,छाया श्रीखंडे,हर्षदा बल्लोळी, सहेजता जाधव, श्रेया रामाने,देवयानी मोहिते,समीक्षा लाड या गाईड नी आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत परीक्षकांची मने जिंकली. कौशल्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. शिवाय सर्व स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या पथकाला उत्कृष्ट गाईड पथकाने सन्मानित करताना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गाईड ना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या गाईड कैप्टन श्रीमती उज्वला सातपुते यांना प्रमाणपत्रासह सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यांना संस्थेचे अध्यक्ष आशीष भाई शाह, उपाध्यक्षा डॉ तृप्तीभाभी शाह यांचे सह शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांचे प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली. शाळेतील संपूर्ण स्टाफ चे देखील सहकार्य लाभले.
प्रा डॉ विलास पवार यांनी चिंतन दिनाच्या निमित्ताने संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या कार्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी सेवाभाव, शिस्त आणि देशप्रेमाची शिकवण आत्मसात करण्याचा संदेश दिला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा संघटक कविता चौगुले यांनी स्काऊटिंग मुळे विद्यालयाचा लौकिक जिल्ह्यात अधिक उंचावला जाईल, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होवून ही चळवळ अधिक मजबूत होईल असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट श्री मंगेश खोत यांनी केले तर आभार जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड माननीय श्रीमती उज्वला सातपुते यांनी मानले.