निपाणी नगरी वृत्तसेवा..(6)
व्यवसायातून प्रगती साधणारे अनेक असतात. मात्र सेवाव्रत स्वीकारून समाजातील रंजल्या गांजल्यांना मानसिक आणि आर्थिक स्वरूपात मायेचा आधार देणारे रत्नशास्त्री दिवंगत एच. ए. मोतीवाला होते. त्यांनी सर्वधर्मातील नागरिकांना, संघ, संस्था, संघटनांना सामाजिक उपक्रमांसाठी तसेच वैयक्तिक गरजूंनाही मदतीचा सढळ हाताने लाभ दिला. त्यांची समाजसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्रीमंत विजयराजे निपाणकर सरकार यांनी केले.
निपाणीतील नामवंत रत्नशास्त्री दिवंगत एच. ए. मोतीवाला यांची 76 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी विजयराजे निपाणकर यांच्या हस्ते दिवंगत एच. ए. मोतीवाला यांच्या पुतळ्यास आणि प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला म्हणाले, वडील दिवंगत एच. ए. मोतीवाला यांनी आजारपण, गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण, मठ, मशिदी, मंदिरांसाठी निधी, अन्नदान, दिव्यांगाना अर्थसहाय्य अशा अनेक माध्यमातून समाजसेवा केली. त्यांना आदर्श ठेऊन मोतीवाला फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी करण माने, सुनील शेलार, दीपक घोडके, पांडुरंग भोई, प्रवीण सुतार, योगेश जाधव, अक्षय जाधव, अनिकेत पावले, भूषण खैरे, नरेश शेलार, इरफान पकाली, रणजित पोटी, महेश गाडीवडर, प्रकाश माने, वैभव बोडके, ऋषिकेश सूर्यवंशी, प्रणव पावले, बाळू राऊत,राहुल नांदगावकर,ओंकार सुगते, अभी काटे यांच्यासह मान्यवर, संयुक्त छत्रपती तालीम मंडळ, पावले गल्ली युवक मंडळ, महिला मंडळ, न्यू लायन्स मित्र मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.