निपाणी नगरी वृत्तसेवा..(10)
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर निपाणी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता कल्पकता व कला कौशल्य विकसित करणे असा होता. तसेच या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, तसेच संगणक शिक्षणाबद्दल त्यांचे आवड निर्माण होईल हा मूळ उद्देश होता.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. मॉडर्न इंग्लिश स्कूल मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.स्नेहल सं.पाटील आणि इयत्ता आठवीचा विद्यार्थी कुमार वेदांत कुंभार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कम्प्युटर एज्युकेशन सेंटर निपाणी यांच्यावतीने सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरता मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्री नागराजू तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा आर घाटगे तसेच चित्रकलेचे शिक्षक श्री अजित सुलतान्नावर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.