निपाणी नगरी वृत्तसेवा..(10)
मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे शनिवार दि. 7 मार्च रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह पार पडला. या समारंभच्या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. शाळेचे आवार आज विविध रंगात रंगून गेले. इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी कु रेणू घोटणे आणि कु प्रांजल जिनगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ स्नेहा आर घाटगे यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून जावे या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून दीप प्रज्वलन करून घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना छोटीशी भेटवस्तू देण्यात आली.
सरतेशेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा आर घाटगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले तसेच पुढील आयुष्यात येणार आव्हानाना कसे तोंडाचे याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्रीजी नागराजू शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहा आर घाटगे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.