निपाणी नगरी वृत्तसेवा (28) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाने मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेत तालुका स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला व स्पर्धेतील एक लाख रुपयेचे बक्षीस मिळविले. याबद्दल केंद्रप्रमुख संजय चिखलीकर यांच्या हस्ते मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला. सदर यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला त्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे
सदर स्पर्धेचे मूल्यांकन कागलचे गटशिक्षणाधिकारी सारिका कसोटे व विस्ताराधिकारी रामचंद्र गावडे यांनी केले तर सादरीकरण डी बी बेनाडे यांनी केले सदर यश मिळविण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.