निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित ए. एस. पाटील हायस्कूल, स्तवनिधी येथील दहावी वार्षिक परीक्षा–१ (SSLC Exam 2026) चा निकाल ९४.६२% लागला आहे.
या परीक्षेस एकूण ९३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction), ४० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर १८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळविली. शाळेमध्ये कुमार पृथ्वीराज विजय सावंत यांनी ६१०/६२५ गुण (९७.६०%) मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कुमारी अनुष्का सुकुमार माने यांनी ५९७/६२५ गुण (९५.५२%) मिळवून द्वितीय क्रमांक, तर कुमार सुमित नरगुंदा पाटील यांनी ५६२/६२५ गुण (८९.९२%) मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कुमार पृथ्वीराज सावंत यांनी हिंदी व कन्नड विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण संपादन केले. तसेच कुमारी अनुष्का माने यांनी हिंदी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले.
विशेष म्हणजे, कुमार पृथ्वीराज विजय सावंत यांनी एसएसएलसी परीक्षा २०२६ मध्ये ६१०/६२५ (९७.६%) गुण प्राप्त करून कन्नड माध्यमातून निपाणी तालुक्यात तृतीय स्थान मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री पी. बी. आश्रम संस्थेचे अध्यक्ष जीनरत्न रोटे, उपाध्यक्ष राजूगोंडा पाटील, सचिव सुनील बल्लोळ, संचालक श्री महावीर पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व गुरुकुल कर्मचारी वर्ग यांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.