निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
व्हन्नूर गावचे सुपुत्र, माजी आमदार स्व. दौलतराव निकम यांचे नातू, कर्तव्यदक्ष व जनतेच्या मनात घर करणारे वनविभाग अधिकारी इंद्रजीत निकम यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने अचानक दुःखद निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे.
कर्तव्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि माणुसकी यांचा सुंदर संगम म्हणजे इंद्रजीत होते. वनसेवेत कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागांत आपल्या कामाची अविट छाप उमटवली. जंगल, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
मनाने अत्यंत शांत, संयमी, प्रेमळ व सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या अकाली जाण्याने निकम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व निकम परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. वनमित्र संस्था कागल 💐