निपाणी नगरी वृत्तसेवा.(30) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. विद्यालयातून परीक्षेला बसलेल्या एकूण 75 विद्यार्थ्यांपैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी आठ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले त्यामध्ये
प्रतीक वनमाळी कदम 145,
प्राजक्ता मारुती कुंभार 145,
श्रावणी आनंदा यादव 144,
अर्णव शिवराज पाटील 141,
गिरीजा संजय कुंभार 140,
शरयू मधुकर कुंभार 139,
स्वप्नाली सुरेश पाटील 135,
वेदांत विनायक कांबळे 86, याविद्यार्थ्यांना शासनाकडून प्रत्येकी 48000 इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
सदर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले ,एस डी तोडकर ,व्ही के परीट यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.