निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर प्रतिनिधी (6)
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे संस्थेचे संस्थापक परम श्रद्धेय पद्मभूषण देवचंदजी शाह यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या प्रो. डॉ.जी.डी. इंगळे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. एस.पी.जाधव, IQAC चे समन्वयक डॉ.पी. डी. शिरगावे, डॉ. एल .पी. लंका, प्रशासकीय कर्मचारी श्री. डी. बी पाटील, शिवाजी जाधव, अमर पाटील, नंदन जाधव कनिष्ठ विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी दिलेले योगदान व विद्यार्थ्यांच्या व सीमावासीयांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या कार्याचा वसा आपण सर्वांनी जपूया असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.