निपाणी नगरी वृत्तसेवा:(13)
मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेचे माजी विद्यार्थी श्री. ए. एच. मोतीवाला (रत्नशास्त्री) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना समाजकार्याबद्दल ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाला त्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. ए. एच. मोतीवाला हे मॉडर्न इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे समाजकार्य अतिशय उल्लेखनीय आहे. नेहमी ते शाळेला मार्गदर्शन व मदत करत असतात. त्यांच्या या समाज कार्याबद्दल कौतुक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा आर. घाटगे यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.