निपाणी नगरी वृत्तसेवा (15)
श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम शाळा शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल, सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल निपाणीया ठिकाणी 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावीच्या मुलीने प्रार्थना गीताने करून दिली
पाहुण्यांचे स्वागत इयत्ता दहावीच्या मुलींनी स्वागत गीताने केली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका सौ भोसले मॅडम यांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे चेअरमन श्री मिलिंद चौगुले यांनी केले. ध्वज पूजन व ध्वजारोहण प्रमुख पाहुणे डॉ. अनिल ससे यांच्या हस्ते करण्यात आले मुलां कडून भाषणे देशभक्तीपर गीते भक्ती पर गाण्यावर डान्स सादर करण्यात आले शिक्षक मनोगतात सौ अपूर्वा कुलकर्णी व सनशाइन इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका सौ समीना पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवर मनोगतात डॉ. अनिल ससे, डॉ. सी बी कुरबेट्टी, श्री मिलिंद चौगुले यांनी भारत माते बद्दलव 80 व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले विचार मांडले.
प्रमुख उपस्थिती हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचे इंगळे, श्री स्वप्निल कुरबेट्टी शाळेचे शिक्षक वृंद पालक वर्ग विद्यार्थी वर्ग शाळेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी कोरे हिने केले कार्यक्रमाचे आभार कुमारी श्रेया मगदूम हिने मानले