निपाणी नगरी वृत्तसेवा (15)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागीरथीबाई शाह कन्या शाळेत 15 ऑगस्ट भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात, चैतन्यात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरे करण्यात आला. ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार श्रीमान अनिल कुमार मेहता संस्थेच्या संचालिका डॉ. प्रवीणा शाह, संचालक श्रीमान प्रसन्न दोशी ,शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस जे पाटील, श्री आर पी बामणे आधी उपस्थित होते
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.एस. जे. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले , ज्यामध्ये राष्ट्रीय दिनाचे महत्त्व आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण उपस्थितांना करून देण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला ‘ध्वजारोहण सोहळा’ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यापूर्वी नियमांनुसार राष्ट्रध्वजाचे विधीवत *ध्वज पूजन* करण्यात आले. उपस्थितांनी शिस्तीत सावधान मुद्रेत उभे राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ध्वजारोहणानंतर संपूर्ण परिसर वंदे मातरम व त्यानंतर जन गण मन या राष्ट्रगीताच्या सुरात दुमदुमून गेला. राष्ट्रगीताच्या समाप्तीनंतर विद्यार्थ्यांच्या समूहगानातून *’विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा’*हे स्फुरददायी *ध्वज गीत* मोठ्या उत्साहात आणि तालासुरानंतर गाण्यात आले. या गीताने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रखर केली.
15 ऑगस्ट निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरव करण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
यावेळी यु बी नागावे, एम एम चिकोडे, एस आर ईराज, पी आर पाटील ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, के आर चोपडे, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी . पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे , पालक व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या . सी एम बाडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.