निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर(15)
येथील जनता शिक्षण मंडळ संचलित ; मोहनलाल दोशी विद्यालय, देवचंद कॉलेज ,किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट प्राथमिक विद्यालय ,आयटीआय, देवआशीष इंग्लिश मीडियम,यांच्या संयुक्त विद्यमाने 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त ,संचालक प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते झाले , ध्वजास एन.सी सी., एअरविंग , व्हाईट आर्मी, स्काऊट गाईडच्या पथकांनी मानवंदना दिली व सामूहिक वंदेमातरम ,राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
तसेच नशामुक्ती व कॉपी मुक्ततेसाठी शपथ घेण्यात आली तसेच सीमेवरील सैनिकांसाठी विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या पाठविण्यात आल्या. ध्वजारोहण प्रसंगी संचालक प्रदीप मोकाशी, देवचंद कॉलेजचे प्र प्राचार्य डॉ रमेश साळुंखे , पर्यवेक्षक डॉ अशोक डोनर,तसेच एम डी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस एम गोडबोले,किरणभाई शाह विद्यानिकेतन चे मुख्याध्यापक एस. टी. यादव, मराठी कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक एस. के. कांबळे , आय टी आय चे प्राचार्य एम पी भोसले ,देवआशीष ग्लोबल स्कूल च्या मुख्याध्यापिका मोहिते एन सी सी ऑफिसर निरंजन जाधव,एस एम चौगुले, एस एस मगदूम,क्रीडा शिक्षक ए एच आळवे, व्ही व्ही पाटील आदी मान्यवर उपस्थित होते