निपाणी नगरी वृत्तसेवा (30)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ भागीरथीबाई शहा कन्या शाळेत रक्षण आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन, कन्या शाळेच्या वतीने यंदा अत्यंत उत्साहात आणि वेगळ्या सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलाकुसरीने स्वतःच्या हातातून सुंदर राख्या तयार केल्या होत्या.या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षकवृंद यांनी निपाणी येथील*पोस्ट ऑफिस * आणि *कॅनरा बँकेच्या शाखेला* सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहात बँकेचे व पोस्ट ऑफिसचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनगटावर स्वतः तयार केलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरी केली.
कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी एक वेगळाच आनंद आणि अभिमान पाहायला मिळाला. बँक आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींना खाऊ व शुभेच्छा देत त्यांच्या या गोड व कौतुकास्पद उपक्रमाबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे पाटील म्हणाल्या . हा सण केवळ आप्तांपुरता मर्यादित न ठेवता, समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत साजरा करण्याचा एक स्तुत्य उपक्रम शाळेने हाती घेतला.शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजण्यास मदत झाली . राख्या तयार करण्यासाठी मुलींना एस आर इराज यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी आर पी बामणे, यु बी नागावे, एम एम चिकोडे, सी एम बाडकर पी आर पाटील ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, के आर चोपडे, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी . पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे , विद्यार्थिनी उपस्थित होत्या .