निपाणी नगरी वृत्तसेवा (18)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ.भागीरथीबाई शाळा कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खुल्या दसरा महोत्सव क्रीडा स्पर्धेत उज्वल यश संपादन केले .क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय, निपाणी यांच्यावतीने नुकत्याच जोल्ले पब्लिक स्कूल मैदानावर क्रीडा स्पर्धा पार पडल्या .हॉलीबॉल व थ्रो बॉल विद्यार्थिनींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत *प्रथम क्रमांक* पटकावला आहे. व कबड्डीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
संघाना मिळालेल्या या घवघवीत यशामुळे त्यांची *जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी* निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यिनींना संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शहा व सर्व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे. पाटील व क्रीडा शिक्षिका ए. डी. पाटील व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.