निपाणी नगरी वृत्तसेवा..(23)
श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमितचे नूतन चेअरमन किशोर बाळी व व्हाईस चेअरमन डॉ. सी बी कुरबेट्टी यांचा गुरुवार पेठ महिला शाखेकडून सत्कार सोहळ्याचे आयोजन.
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व सौहार्द फेडरेशन मधील नामवंत श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या चेअरमन पदी किशोर बाळी व व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाले बदल गुरुवार पेठ महिला शाखा संचालक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यालय निपाणी या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये बोलताना महिला संचालिका पुष्पा कुरबेट्टी म्हणाल्या की संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून सभासदांचा विश्वास जिंकलेला आहे. संस्थेचा पारदर्शक व्यवहार करून संस्थेचे नाव कर्नाटका मध्ये लौकिक करून सभासदांचे हित जोपासले आहे. त्यामुळे सभासदांचा संस्थेच्या संचालक मंडळाचा विश्वास मजबूत झाला आहे. त्यामुळे संस्थेने यशाची शिखरे गाठली आहेत असे सांगितले.
कार्यक्रमास महिला शाखा चेअरमन वृषाली परमणे .व्हॉइस चेअरमन स्मिता दुमाले. संचालिका विजया शेट्टी. सुवर्णा पट्टनशेट्टी. उमा पाटील. उमा बागेवाडी. वृषाली पाटील. कल्पना कोठीवाले. मीनाक्षी लिगाडे. व हेड ऑफिस संचालक प्रताप पट्टनशेट्टी. श्रीकांत परमणे. डॉक्टर एस आर पाटील. सुरेश शेट्टी. महेश बागेवाडी. अशोक लिगाडे दिनेश पाटील. राजेश पाटील व हेड ऑफिस सी इ ओ एस के आदन्नावर. असिस्टंट सीईओ महेश शेट्टी. विद्या कमते. भद्रेश फुटाणे, महादेव बडगीर, चंद्रकांत हंबर,राहुल घाटगे,सुरज घोडके. व असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.