निपाणी नगरी वृत्तसेवा..(10)
“वर्धापन दिनानिमित्त अनिल अंडी सेंटरची खास ऑफर; एका दिवसात तब्बल २२,५०० विक्रमी अंड्यांची विक्री निपाणी शहरासह परिसरातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आकर्षक दरामुळे दिवसभर गर्दी”
निपाणी चिकोडी रोडवरील महात्मा बसवेश्वर सर्कल, जत्राट वेस येथे असलेल्या अनिल अंडी सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या विशेष सवलत योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ऑफरचा लाभ घेत निपाणी शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहकांनी अवघ्या एका दिवसात तब्बल २२ हजार ५०० अंड्यांची खरेदी केल्याची माहिती दुकानाचे मालक अनिल भिलुगडे यांनी दिली.
अनिल अंडी सेंटरने यशस्वीपणे पाच वर्षांचा प्रवास पूर्ण करत वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली होती. रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत किरकोळ ग्राहकांसाठी फक्त ४ रुपये ७५ पैशांत एक अंडे, तर घाऊक ग्राहकांसाठी ३० अंडी केवळ १३५ रुपयांत देण्यात आली. या आकर्षक दरामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अंड्यांची खरेदी केली.
विशेष सवलत योजनेमुळे दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. किराणा दुकाने, फास्ट फूड सेंटर, हॉटेल्स, बेकरी तसेच हॉस्टेल व मेस चालकांनीही या ऑफरचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे एका दिवसात तब्बल २२,५०० अंड्यांची विक्री होऊन या उपक्रमाला मोठे यश मिळाले.
यावेळी बोलताना मालक अनिल भिलुगडे यांनी सांगितले की, ग्राहकांनी दिलेला विश्वास आणि सहकार्यामुळेच अनिल अंडी सेंटरचा प्रवास यशस्वी झाला आहे. पुढील काळातही ग्राहकांना दर्जेदार अंडी व उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुकान वेळ : सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पत्ता : अनिल अंडी सेंटर, चिकोडी रोड, महात्मा बसवेश्वर सर्कल, जत्राट वेस, निपाणीसंपर्क : ९६११३२३०९६ / ९९८६६०४०६७