निपाणी नगरी वृत्तसेवा..(12)
नुकत्याच पार पडलेल्या बेळगाव येथे राणी चन्नम्मा यूनिवर्सिटी सिंगल झोन तायक्वांदो इंटरपोलिगेट निवड स्पर्धा लखमगौडा सायन्स इन्स्टिट्यूट बेळगाव येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये विजापूर, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यातून निपाणी, चिकोडी, संकेश्वर,रायबाग, गोकाक, अथणी, येथून मुला मुलींनी सहभाग घेतला होता. सध्या साईप्रसाद हा के एल एस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स बेळगाव येथे शिक्षण घेत आहे. या स्पर्धेदरम्यान 87 किलो आतील मुलांच्या गटात साईप्रसाद सुनील लाटकर या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक पटकावले.
यशस्वी विद्यार्थ्याचे दिनांक 16 ते 20 मार्च रोजी होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा जालंधर पंजाब येथे होणार असून यशस्वी विद्यार्थ्याला तायक्वांदो प्रशिक्षक श्री बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर गोगटे कॉलेजचे प्राध्यापक व क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभत आहे. तसेच पालक सुनील लाटकर आई नीता लाटकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.