निपाणी नगरी वृत्तसेवा..(9)
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकल पालक म्हणून पतीच्या मागे अत्यंत कष्टातुन संसाराचा गाडा ओढणाऱ्या श्रीमती गंगा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी एन जे खेबुडे यांनी मनोगतातुन समाजातील महिलांची सद्यस्थिती स्पष्ट केली व महिला सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली प्रारंभी प्रास्ताविकातून यु एम सातपुते यांनी महिला दिनाचा हेतू सांगितला,याप्रसंगी विद्यार्थिनींनी मनोगते व महिलांचे महत्व सांगणारे नृत्य सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांनी महिलांना आयुष्यात एका दिवसापूरता मान न देता नेहमी मानसन्मान मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी स्काऊटगाईड मधील राज्यपुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याचा, हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विज्ञान प्राविण्य पात्र विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक आर डी देसाई कर्मचारी प्रतिनिधी ए आर कोळी आदी मान्यवरांसह सर्व महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन डी बी बेनाडे यांनी केले तर आभार एस के बुच्चे यांनी मानले कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.