बेळगाव येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये अंकुरम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश!
विजेत्यांना, मेडल व प्रशस्तीपत्र होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्या ज्योती फर्नांडिस यांच्या हस्ते देण्यात आले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (3)
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल बिडी नंदगड, जि. बेळगाव येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल कोडणी, निपाणीच्या स्केटिंग खेळाडूंनी विविध गटामध्ये सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांची कमाई केली. या सर्व विजेत्यांना मेडल व प्रशस्तीपत्र होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्या ज्योती फर्नांडिस यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बेळगाव रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव सूर्यकांत हिंडलगेकर विविध स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक, पालक व मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.
विजेते खेळाडू पुढील प्रमाणे; *बिगिनिअर कॅटेगिरी*
*पाच वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये:*
अद्वैत गंथाडे प्रथम क्रमांक,
*सहा वर्षाखाली मुलांच्या गटांमध्ये*
राजवीर कडाकणे प्रथम क्रमांक,
जियान बागवान द्वितीय क्रमांक
*सहा वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये*
आदिती दाभोळे प्रथम क्रमांक
*आठ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये*
अनन्या तांबेकर प्रथम क्रमांक
संस्कृती पाटील द्वितीय क्रमांक
*आठ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये*
सीनान बागवान प्रथम क्रमांक
*स्कॉड स्केटिंग प्रकारामध्ये आठ वर्षाखालील गटांमध्ये*
आर्यन निंबाळकर प्रथम क्रमांक
प्रज्ञेश वंजारी द्वितीय क्रमांक
*बारा वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये*
सुफियान इनामदार तृतीय क्रमांक
*14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये*
नील बंडू पाटील द्वितीय क्रमांक तर
*फॅन्सी इनलाईन प्रकारामध्ये बारा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये*
कृष्णराज सडोलकर तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व मुलांना प्रशिक्षक इंद्रजीत मराठे यांचे मार्गदर्शन तर संस्थेच्या प्राचार्या चेतना चौगुले, संचालक डॉ. उत्तम पाटील, डॉ.ज्योतिबा चौगुले, संस्थेचे सचिव डॉ. अमर चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.