निपाणी नगरी वृत्तसेवा (8)अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षा मार्च 2026चा निकाल 99.21 टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे
विद्यालयातून एकूण 257 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 253 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील 125 विद्यार्थी (डिस्टिक्शन) विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण ,तर 86 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तसेच 35 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 7 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी घेऊन यशस्वी झाले.
त्यामधील कु संस्कृती अशोककुमार मोरबाळे 97.40 टक्के गुण मिळवून अर्जुननगर केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला,तर कु. हर्षवर्धन महादेव पंडिवडे 96.80 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु.प्रतिक अरुण पाटील 96.40 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावले त्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशीषभाई शाह, उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभाभाभी शाह, व डॉ.सौ तृप्ती शाह यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. तर मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.