निपाणी नगरी वृत्तसेवा (15)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बेंगलोर मधील नामवंत आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरम देशभक्तीपर गीत म्हणण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवर संचालकाकडून करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन किशोर बाळी यांच्या हस्ते सकाळी ठीक 7:30 वाजता ध्वजारोहण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. व झेंड्याला सलामी देऊन वंदे मातरम, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय,अशा राष्ट्र प्रेमी घोषणा देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सहकार रत्न चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी, डॉक्टर एस आर पाटील, श्रीकांत परमणे,प्रताप पटनशेट्टी. महेश बागेवाडी ,अशोक लिगाडे. सुरेश शेट्टी. दिनेश पाटील राजेश पाटील संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी यांच्यासह पोपटलाल गुजर, स्वप्निल कुरबेट्टी, सोमनाथ परमणे, गजानन वसेदार, विजय मेत्रानी, विजय पोतदार, राजेंद्र बंकापुरे, सीईओ एस के आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रश फुटाणे, विद्या कमते ,महादेव बडगीर चंद्रकांत हंबर, सुरज घोडके, सुजाता जाधव ,व असंख्य कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक, स्वागत व आभार संस्थेचे कर्मचारी दिलीप गायकवाड यांनी केले.